मुंबई, ८ जुलै २०२० : कोरोनाचा प्रभाव हा आता क्रिकेट विश्वात देखील दिसून येत आहे. क्रिकेटच्या नियमात काही महत्वपुर्ण बदल करण्यात आले असून अनेक नवीन निर्बंध लागू होणार आसल्याची माहिती समोर आली आहे. विश्वजगतात लोकप्रिय असलेल्या क्रिकेट खेळाला देखील कोरोनाचा फटका बसला आसून त्यात आता नवीन निर्बंध लागू झाले आहेत.
काय नियम आहेत ते पाहू…
१) सीमेपलीकेडील चेंडू हा राखीव खेळाडू हातात ग्ल्वोज घालून आणेल.
२) जर एखाद्या खेळाडूला बाद केले तर मग संपुर्ण संघ एकत्रित येऊन जल्लोष करायचा नाही.
३) खेळाडूनीं स्वत:च्या वस्तू या स्वत:च मैदानाबाहेर ठेवायच्या.
४) खेळाडूनीं आपले स्वेटर,गाॅगल,चष्मा,टोपी अशा वस्तू पंचाकडे द्यायच्या नाहीत.
५) खेळाडूंनीं चेंडूला थुंकी लावायची नाही.
६) खेळाडूनीं चेंडूला २ वेळा थुंकी लावली तर त्यांना समज दिली जाईल अथवा तिस-यांदा थुंकी लावल्यास ५ धावा या विरोधी संघाला देण्यात येतील.
७) स्थानिक सामन्याना तेथील स्थानिक पंचानांच प्रथम प्राध्यान्य दिले जाईल.
८) चेंडू हा वेळोवेळी सैनिटाईज करायची जबाबदारी हि पुर्णपणे पंचाची आसेल.
असे नवीन नियम हे या कोरोनाच्या संसर्गा पासूनच्या बचावासाठी क्रिकेट बोर्डाने केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी