उत्तरप्रदेश: दररोज अंडे खायला मिळत नसल्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ती महिला नक्की याच कारणामुळे पळाली की त्यामागे अजून काही कारण आहे.याचा तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, त्या महिलाचा पती दररोज रोजनदारीचे काम करतो. त्यामुळे तो कसाबसा घर चालवत असतो. त्याच्या पत्नीला दररोज अंडे खाण्याची सवयी होती. त्यामुळे तिला दररोज अंडे खायला मिळत नव्हते. त्यामुळे पतीची आणि तिचे वाद व्हायचे. एकदा ती प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर काही दिवसातच ती पुन्हा परत आली. परंतु काही दिवसात अंडे खायला मिळत नसल्याच्या कारणावरून तिने प्रियकरासोबत पळून गेली.
मला माझा नवरा मला अंडे खायला देत नसल्याची पतीविरोधात तक्रार त्या महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरुन पोलिसांनी अधिक तपास केला असता, प्रियकराच्या घरात कुलूप असल्याचे आढळले.त्यावरून ती महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.