आंदोलनात हिंसाचार बंद करा, मग सुनावणी होणार: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: तुमच्या याचिकेवर सुनावणी करू. मात्र, त्याआधी हिंसाचार थांबवण्यात यावा असे स्पष्ट शब्दात आज सुप्रीम कोर्टाने आंदोलक विद्यार्थ्यांना समज दिली. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. देशभरात मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले. पोलिसांकडून हिंसाचार करण्यात आला. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी यावेळी मांडला.
जामिया मिलिया विद्यापीठ आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी ज्येष्ठ वकील अॅड. इंदिरा जयसिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत हे कोर्ट रुम आहे. इथं शांततेत आपली बाजू मांडावी लागेल. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होईल. मात्र, त्याआधी हिंसाचार थांबला पाहिजे अशी ताकीद ही कोर्टाने दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा