उत्तरप्रदेश : आपल्या देशात कोण कशाची पैज लावेल याचा काही नेम नाही. मग ती पैज जीवावर बेतली तरी चालेल. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात टाइमपास मध्ये लावलेल्या पैजेचा भयंकर समोर आला आहे.आमच्या प्रतिनिधीने याबाबत माहिती घेतली असता, एका माणसाने ५० अंडी खाण्याची पैज लावली होती. हे ५० अंडे खाण्याच्या नादात त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे राहणाऱ्या सुभाष यादव (४२) हा माणूस मित्रासोबत गप्पा मारत होता. गप्पा मारता मारता सुभाषने मित्राला कोण किती अंडी खाऊ शकतं, असं विचारलं. गमती गमतीत त्यांच्यात ५० अंडी खाण्याची पैज लागली. त्यावर एक बाटली भरून दारूही रिचवण्याची अट होती. पैज जिंकल्यास २ हजार रुपयांचं बक्षीसही ठरवण्यात आले होते.
सुभाषने हसत हसत हा पैजेचा विडा उचलला. त्याने ५० अंडी एकामागोमाग एक खायला सुरुवात केली. ४१ अंडी खाऊन झाल्यानंतर ४२ वं अंडं खात असताना सुभाष बेशुद्ध पडला. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.त्यामुळे माणसाने कोणतीही पैज लावताना ती जीवावर तर बेतणार नाही ना. याचा विचार करुन पैज लावणे गरजेचे आहे.यामुळे नाहक बळी जातात.