टीम न्युज अनकट
पुणे: रिलायन्स कमुयनिकेशनचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी “रिलायन्स कम्युनिकेशन” या दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीच्या अध्यक्षपदाचा शनिवारी राजीनामा दिला. त्यांच्याबरोबर कंपनीच्या चार संचालकांनीही राजीनामा दिला आहे. अनिल अंबानी यांनी का बरं या पदाचा राजीनामा दिला असेल. आपल्याला माहीत आहे का? आमच्या टीमने याबाबत अधिक माहिती घेतली असता,
जुलैपासून सप्टेंबरपर्यंत या तीन महिन्यात कंपनीला ३०,१४२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. भारतातल्या एखाद्या कंपनीला झालेला हा दुसरा सर्वात मोठा तोटा आहे. आर कॉमच्या तोट्याबाबतची आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर अंबानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
दिवाळखोरीच्या प्रक्रियेतंर्गत लवकरच रिलायन्स कम्युनिकेशनच्या संपत्तीचा लिलाव होणार असल्याचे एका वृत्त वाहिनीने म्हटले आहे.दिवाळखोरीच्या प्रक्रियेत असलेल्या आरकॉमने मागच्या वर्षी याच तीन महिन्यात १,१४१ कोटीचा फायदा कमावला होता.
सध्या शेअर बाजारात आरकॉमच्या शेअरचा भाव ५९ पैसे आहे. छाया विरानी, रायना कारानी, मंजरी काकेर आणि सुरेश रंगाचर यांनी सुद्धा कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
शुक्रवारी रिलायन्स कम्युनिकेशन्सने दुसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीला ३०,१४२ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे अनिल अंबानी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.