अनिल देशमुख यांच्या जामीनावरील सुनावणी २ डिसेंबरपर्यंत तहकूब

6

मुंबई, ,२९ नोव्हेंबर २०२२ मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावरील सुनावणी २ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

सीबीआयकडून बाजू मांडणारे एएसजी अनिल सिंह प्रकृती अस्वस्थ्यामुळे आज उपस्थित राहू शकले नाहीत. एका अर्जाद्वारे याप्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी केली असता न्यायालयाने ही मागणी मान्य करत सुनावणी शुक्रवार, २ डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

दरम्यान, सुनावणी पुढे ढकलण्यास अनिल देशमुखांच्या वकिलांनी तीव्र विरोध केला. तसेच तपास यंत्रणा केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप यावेळी देशमुखांच्या वतीने करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

अनिल देशमुखांवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सध्या अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ‘ईडी’नेही या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप ‘ईडी’कडून करण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा