ISSF विश्वचषक स्पर्धेत अनिश भानवालाने जिंकले कांस्य पदक!

कैरो, २४ फेब्रुवारी २०२३ : कैरो येथे ISSF विश्वचषक स्पर्धेत युवा नेमबाज अनिश भानवालाने कांस्यपदक जिंकले आहे. भारताचा युवा नेमबाज अनिश भानवाला याने गुरुवारी (२३ फेब्रुवारी) कैरो येथे ISSF विश्वचषक रायफल/पिस्तूल स्पर्धेत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. भारताला तब्बल १२ वर्षानंतर रॅपिड-फायर पिस्तूल वर्ल्डकपमध्ये पदक मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय नेमबाज अनिश भानवालाचे हे पहिले वरिष्ठ वैयक्तिक विश्वचषक पदक आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत भारतीय नेमबाज विजय कुमार याने २०१२ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आणि विश्वचषक स्पर्धेत दोन पोडियम फिनिश केले होते. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी अनिश भानवाला याने ही कामगिरी केली आहे. भानवालाने हे पदक त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक हरप्रीत सिंग यांना समर्पित केले आहे.

दरम्यान, या स्पर्धेत इटलीच्या मॅसिमो स्पिनेलाने पदकाच्या लढतीत सुवर्णपदक जिंकले, तर फ्रान्सचा क्लेमेंट बसाग्युएत याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा