नेपाळची गोलंदाज अंजली चंद चे टी२० मध्ये शून्य धावांत सहा बळी

पोखरा: नेपाळची गोलंदाज अंजली चंद हिने सोमवारी टी२० क्रिकेट मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. मालदीप च्या सामन्यात तीने एकही धाव न देता सहा गाडी बाद केले. प्रथम फलंदाजी करणार्‍या मालदीपचा डाव अवघ्या १६ धावांत आटोपला. नेपाळ ने हे आवाहन अवघ्या ५ चेंडूत पार केले, मालदिप चा डाव गुंडाळताणा अंजलीने सहाव्या शतकात तीन बळी मिळविले. त्यानंतर नवव्या शतकात ३ आणि ११ व्या शतकात एक गडी बाद करताना मालदीपच्या डावला पूर्णविराम दिला . संपूर्ण सामन्यात मध्यम गती गोलंदाज अंजलीने केवळ १३ चेंडू टाकले. महिला टी२० क्रिकेटमधील यापूर्वी चा विक्रम मालदीपच्या मास एलीसा हिच्या नावावर होता. तिने याच वर्षी चीन विरुद्धा ३ धावांत ६ गडी बाद केले होते. पुरुश्यांच्या टी२० क्रिकेट मध्ये भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याच्या नावावर हा विक्रम असून त्याने गेल्याच महिन्यात बांग्लादेश विरुद्ध सात धावत सहा गडी बाद केले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा