पुरंदर दि.१ ऑगस्ट २०२० : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ही जयंती साजरी होत आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली सासवड नगरपालिकेच्या कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन करून ही जयंती साजरी करण्यात आली
सासवड येथील नगरपालिकेसमोर मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक म्हस्कू शेडगे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस. हाके व आर. एन. जगताप यांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष आर. एन. जगताप, आबासाहेब खवले, भाऊसाहेब चखाले, महादेव भोंडे, संदीप भोंडे, अण्णा आवसरे, लक्ष्मण मांढरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब खवले यांनी केले. तर प्रास्ताविक प्रास्ताविक व आभार म्हस्कू शेडगे यांनी मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी