अण्णासाहेब जाधव यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे अंतरिक सुरक्षासेवा पदक जाहीर

पुरंदर दि.१० जून २०२०: पुरंदर भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे दिले जाणारे आंतरिक सुरक्षा सेवा पदक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

आण्णासाहेब जाधव यांनी गडचिरोली येथे अॉगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर कार्यरत असताना नक्षलवाद्यांविरोधात कारवाया करून तेथील जनतेमध्ये पोलिसांच्या विषयी विश्वास निर्माण करून जनता व पोलिस यांच्यामध्ये संबंध सुधारले. या उल्लेखनीय कार्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेऊन त्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे.

यापुर्वी आण्णासाहेब जाधव यांना गडचिरोली येथील उल्लेखनीय कार्यामुळे सन २०१८ मध्ये पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह, सन २०१९ मध्ये राज्य सरकारने विशेष सेवा पदक बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांना  केंद्रीय गृह मंत्रालयाचा आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाल्याबद्द्ल पुरंदर तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा