नीरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

पुरंदर दि.१ ऑगस्ट २०२० : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सध्या पध्दतीने ही जयंती साजरी करण्यात आली. नीरा ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.अश्विनी घाटगे यांच्या हस्ते आण्णा भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आज जन्मा शताब्दी म्हणून साजरी करण्यात येत आहे. आज नीरा येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात आण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती गोरखनाथ माने, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण निरेचे उपसरपंच विजय शिंदे, माजी सरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, दिपक काकडे, गणपत लाकडे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब खाटपे फौजदार विजय वाघमारे,सुदर्शन होळकर सुनील पाटोळे, संतोष गवळी, पोपट खुडे, सागर पाटोळे, सागर भिसे, रमेश वाघमारे, शिवाजी गोरे, दीपक जाधव, गणेश पाटोळे, सूरज खुडे, दादासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये निरेच्या वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी अश्विनी घाडगे, यांनी कोरोना काळात न डगमगता केलेली वैद्यकीय सेवा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे, भरत निगडे, यांनी केलेले समाज प्रबोधन, सामाजिक कार्यकर्ते मंगेश ढमाळ यांनी केलेली समाजसेवा, लहुजी वस्ताद सेनेचे बारामती तालुका अध्यक्ष राजेंद्र भिसे तसेच नीरा ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांनी सध्याच्या कोविडच्या काळात केलेल्या कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी राजेश काकडे, अनिल चव्हाण, दीपक काकडे, दत्ता चव्हाण, डॉ. अश्विनी घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कोरोनाच्या पार्श्वभूमी अत्यंत थोड्या वेळात हा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा गायकवाड यांनी केले तर आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पाटोळे यांनी मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा