गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा

जम्मू काश्मीर, २६ सप्टेंबर २०२२ : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आज जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नव्या पक्षाची घोषणा केली आहे, तर त्यांच्या नवीन पक्षाचे नाव डेमोक्रॅटिक आजाद पार्टी आहे.

गुलाम नवी आझाद यांनी काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल झाले पाहिजे, यासाठी सर्व पदांचा राजीनामा दिला आणि काँग्रेस मधून बाहेर पडले त्यानंतर त्यांनी नव्या पक्षाची घोषणा काही दिवसात करणार आहे असे सांगितले. तसेच माझ्या पक्षाचे नाव हिंदुस्थानी असेल. यामध्ये हिंदू मुस्लिम शीख आणि या सर्वांचा पक्ष असेल असेही सांगितले होते.

गुलाम नबी आझाद यांनी यापूर्वीच पक्षाचा अजेंडा स्पष्ट केला असून, यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे आदी मुद्द्यांचा समावेश आहे. मार्च २०२२ मध्ये गुलाम नबी आझाद यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पक्षाच्या अजेंडा वर पुढे म्हणाले की, माझ्या विधानसभेत लेफ्टनंट गव्हर्नर नव्हते. लोकांना त्यांच्या जमिनी मिळाव्यात. जम्मू-काश्मीरच्या लोकांना पर्यटन स्थळ मार्फत तरुणांना रोजगार देणार तसेच कश्मिरी पंडितांचा कश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करणे हा माझ्या पक्षाचा मुख्य अजेंडा असणार आहे, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच नव्या पक्षाची घोषणा करत काँग्रेसला ललकारले आहे.

आमच्या पक्षाची विचारधारा ही गांधींची विचारधारा आहे. आमची धोरणे जात आणि धर्मावर चालणार नसल्याचेही आझाद म्हणाले. राजकारणात आपल्याला सर्व धर्मांबद्दल आदर असून, आम्ही सर्व पक्षांचा आदर करतो. आमचे कोणाशीही राजकीय वैर नसल्याचे आझाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा