टोकियो, 5 मे 2022: या प्रसिद्ध कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन सुट्या देण्याची घोषणा केलीय. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून केवळ 4 दिवस कामावर यावं लागणार आहे. कंपनीच्या या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे.
या कंपनीचं नाव पॅनासोनिक असून ती जपानी कंपनी आहे. पॅनासोनिकने जपानी सरकारच्या अलीकडील मार्गदर्शक सूचनांनंतर हे पाऊल उचललं आहे, ज्याने कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्यांना चार दिवसांच्या वैकल्पिक सुट्टीसाठी प्रोत्साहित करण्यास सांगितलंय.
सरकारचं म्हणणं आहे की अतिरिक्त सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना त्यांची मुलं, पालक, कुटुंबातील कोणत्याही वृद्ध सदस्याची काळजी घेण्यासाठी किंवा स्वयंसेवक काम करण्यास मदत केली जाईल.
आठवड्यातून 3 सुट्ट्या
‘जपान टाईम्स’च्या वृत्तानुसार, पॅनासोनिक कंपनीकडून सांगण्यात आलंय की, एका आठवड्यात 3 सुट्ट्या घेण्याचा पर्याय प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलाय. निकाल पाहिल्यानंतर, तो पूर्णवेळ करण्याचा विचार केला जाईल. तथापि, जपानमधील Hitachi, Mizuho Financial Group, Fast Retailing, Uniqlo सारख्या कंपन्या पॅनासोनिकच्या आधीपासूनच त्यांच्या कर्मचाऱ्यांना तीन आठवड्यांच्या सुट्ट्या देत आहेत.
याबाबत रिक्रूट वर्क्स इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ संशोधक हिरोमी मुराता यांनी सांगितलं की, कंपन्यांना शॉर्ट वर्क वीक योजनेद्वारे कर्मचाऱ्यांना व्यस्त ठेवायचे आहे. कारण नवीन कर्मचार्यांची नियुक्ती आणि प्रशिक्षणासाठी वेळ लागतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे