कोरोना संकटामुळं आणखी १५ कोटी मुलं दारिद्र्याच्या जाळ्यात…!

जिनेवा , १८ सप्टेंबर २०२०: युनायटेड नेशन्स चाइल्ड फंड (युनिसेफ) च्या नव्या विश्लेषणावरून असं दिसून आले आहे की, कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून १५ कोटीहून अधिक मुलं दारिद्र्याच्या चिखलात अडकली गेली आहेत . या नवीन आकडेवारीमुळं जगात गरीबीत राहणाऱ्या मुलांची संख्या वाढून सुमारे १.२ अब्ज झाली आहे . कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उघड झालेली ही आकडेवारी अत्यंत भयावह आहे.

युनिसेफ आणि बाल हक्क संघटना सेव्ह दी चिल्ड्रन’नं केलेल्या या अभ्यासानुसार गरीबीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण, आरोग्य, निवारा, पोषण, स्वच्छता आणि स्वच्छ पाण्या पासून व जेवणा पासून वंचित आहेत कोरोना संकटामुळं त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साथीच्या आजारानंतर अशा मुलांची संख्या १५% नी वाढली आहे.

युनिसेफनं अहवाल दिला की, या अभ्यासात ७० देशांमधून गोळा केलेला डेटा समाविष्ट आहे. विविध प्रकारच्या दारिद्र्याच्या अंदाजानुसार या देशांच्या शिक्षण, आरोग्य सेवा, घर, पोषण, स्वच्छता आणि पाण्याशी संबंधित आकडेवारी विचारात घेण्यात आली. अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे की सुमारे ४५ टक्के मुलं किमान अत्यावश्यक गरजांपैकी एकापासून वंचित आहेत. युनिसेफनं स्पष्टपणे सांगितलं आहे की येत्या काही महिन्यांत ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकेल.

युनिसेफ आणि सेव्ह द चिल्ड्रन म्हणाले की आम्ही परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आणि या देशांमधील सरकारांशी कार्य करण्यास वचनबद्ध आहोत. सध्या मोठ्या संख्येनं मुलांना गरीबीचा सामना करावा लागतोय. एवढंच नव्हे तर जे आधीच गरीब आहेत ते आणखी गरिबीत जात आहेत. युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोरे म्हणाल्या की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं लाखो मुलं अधिक दारिद्र्यमय झाली आहेत.

हेनरिटा फोरे म्हणतात की, चिंता ही आहे की आपण या संकटाच्या शेवटी नाही तर सुरुवातीस आहोत. मुलं शाळा, औषध, अन्न, शुद्ध पिण्याचे पाणी आणि घर यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहू नयेत यासाठी देशांनी त्वरित पावलं उचलली पाहिजेत. त्याच वेळी सेव्ह द चिल्ड्रन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी इंगर एशिंग म्हणाले की, साथीच्या आजारानं इतिहासातील सर्वात मोठी शैक्षणिक आणीबाणीला जन्म दिलाय. वाढत्या दारिद्र्यामुळं मुलांना व त्यांच्या कुटुंबीयांना या परिस्थितीतून पुन्हा वर येणं फार कठीण जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा