बॉलिवूडला आणखी एक धक्का,या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

मुंबई, २८ जुलै, २०२० : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचं निधन झालं आहे. या वृत्तामुळे बॉलिवूड मध्ये शोककळा पसरलेली आहे.

२०२० या वर्षा मध्ये बॉलिवूडने अनेक अभिनेते गमावले आहेत. ऋषी कपूर जी , इरफान खान , सरोज खान आणि सुशांत सिंग राजपूत अशा उत्तम कलाकारांना बॉलिवूडने गमावलं आहे.

त्यातच आज वयाच्या ८६ व्या वर्षी कुमकुम यांनी अखेरचा श्वास घेतला. कुमकुम यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

कुमकुम यांचं आज सकाळी निधन झालं असून या संबंधीची अधिकृत माहिती जावेद जाफरी यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कुमकुम यांची प्रकृती ठीक नव्हती. मुंबई मध्ये लिंकिंग रोडवर त्यांचा बंगला आहे. पुढे तो बंगला जमिनदोस्त झाला आणि तिथे इमारत बांधण्यात आली.

कुमकुम यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. किशोर कुमार आणि गुरू दत्त यांच्या सोबत ही कुमकुम यांनी काम केलं होते . तसेच मिस्टर एक्स इन बॉम्बे, मदर इंडिया, सन ऑफ इंडिया, कोहिनूर, उजाला, नया दौर ,श्रीमान यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अंकुश धावरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा