बारामतीतील माळेगावात सापडला आणखी एक कोरोनाबाधित

पुणे, दि.१२ मे २०२०: बारामती तालुक्यातील माळेगाव येथील एका ३७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. असे त्याच्या आलेल्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. माळेगाव परिसरातील हा कोरोना बाधित रुग्ण पुणे येथून ६ दिवसांपूर्वी माळेगाव येथे आला होता. त्याला अचानक घशाचा त्रास होऊ लागल्याने शहरातील शासकीय सिल्वर जुबली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये तो संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले.

माळेगाव परिसरात सापडणारा हा दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आहे. तर ग्रामीण भागातील तिसरा रुग्ण ठरला आहे. त्यामुळे माळेगाव आता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुणे-मुंबई येथील बरेचसे नागरिक बारामती परिसरात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका जास्त वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा