नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर २०२०: देशावर एकीकडे कोरोनाचे संकट चालू आहे तर दुसरी कडे अनेक समस्या निर्माण होत आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी निवार या चक्रिवादळाने तमिळनाडु आणि पाँडेचेरी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. तर या निवार चक्रिवादळ आणि भूस्खलनाच्या ठिक एक दिवसानंतर बंगालच्या खाडी मधे पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते आणि हे चक्रीवादळ पुन्हा तमिळनाडु आणि पाँडेचेरी कडे येऊन २ डिसेंबर ला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तमिळनाडु आपदा प्रबंधन प्राधिकरणाने शुक्रवारी सांगितले की, बंगालच्या दक्षिण पुर्व खाडी भागात कमी दाबाचा पट्टा विकसित होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शंका आहे.
“दक्षिण-पूर्व बंगाल च्या खाडी वर हा दबाव निर्माण होण्याची शक्यता आसून, पुढील २४ तासात एका ठिकाणी केंद्रीत होऊन पुढे तीव्र स्वरूप धारण करून पश्चिमेकडे जाईल आणि २ डिसेंबर ला तामिळनाडु पाँडेचेरीच्या तटीय भागा पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
तमिळनाडु बरोबर पाँडेचेरी मध्येही मुसळधार पाऊस…
ही बातमी तमिळनाडु मधुन कमीत कमी तीन लोकांच्या मेल्यानंतर एक दिवसाने आली. कारण चक्रीवादळ निवारमुळे बुधवारी मध्यरात्री आसपासच्या भागात भूस्खलन झाले. वादळाने १००० पेक्षा अधिक झाडांना उपसून फेकले. तर या मुळे काही खालचे भाग वाचले आसून या दरम्यान तामिळनाडु पाँडेचेरी मधे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश मधे ही पाहयला मिळाला तिथेही पाऊस पडला. तर तामिळनाडुतील २.३० लाख लोकांना राहत शिबिरांमधे सुरक्षिते साठी पाठवण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव