नाशिक, २६ जून २०२०: सध्या भारताच्या दोन्ही सीमेवर तणावाचे वातावरण आहे, एकीकडे पाकिस्तान काश्मीर
खो-यात अातंकवादी घुसवून एक प्रकारचे छुपे युध्दच लडत आहे. परंतू आपली सेना व आपले जवान त्यांना चोख प्रति उत्तर देत आहेत.
मागील काही महिन्यात आपल्या सैन्याने काश्मीर खो-यात कारवाई करत अनेक आतंकवाद मारले तर आपल्या सेनेचा कणा असलेली आर्टिलरी सीमेपलीकडील पाकिस्तानी सेनेला चोख प्रतिउत्तर देत आहे.
त्याच प्रमाणे कोरोनो वायरसचा प्रसार जे देशातून झाला असा अारोप असलेला चीन देखील मागील दोन महिन्यापासून भारताची कुरघोडी काढत आहे पण त्यांना देखी आपले जवान चांगलेच उत्तर देत आहेत. या सैन्यांचा मदतीला आता अपाचे, शिनुक, मिराज व मिग सारखी वायूसेनेची विमाने व हेलिकॉप्टर आहे तर जमीनीवरून जमिनीवर मारा करणारी आर्टिलरी देखील भारत चीनच्या सीमेवर पोहचत आहे.
याच आर्टिलरीची एक बैच आज नाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटर मधून बाहेर पडली . देशसेवासाठी सज्ज होत नाशिकच्या या प्रशिक्षण केंद्रातून २८८ रेक्टस्चे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर वीर जवानांचे बाहेर पडले आहेत. इंडियन आर्मीमध्ये त्यांचे स्वागत .
न्यूज अनकट प्रतिनिधी