मुंबई, दि. २८ एप्रिल २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त असलेले राज्य महाराष्ट्र आहे. राज्यात करोनाचे आज ५२२ नवे रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर २७ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. एकूण ८५९० बाधित रुग्ण आत्तापर्यंत महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. एकूणच ही परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला २४ तास सज्ज राहावे लागत आहे. या संकटात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. याच्याशी लढा देताना काल पुन्हा एक पोलिस कर्मचारी बळी पडला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. गेल्याच आठवड्यात मुंबईमधील एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि काल पुन्हा एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे. पोलीस नाईक शिवाजी नारायण सोनावणे असे मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आहे.
सोनावणे हे कुर्ला वाहतूक विभाग मध्ये कार्यरत होते. कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे जीव गमावणारे ते तिसरे पोलीस कर्मचारी आहेत. पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करत केली आहे .
न्यूज अनकट प्रतिनिधी