नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर २०२०: लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पँगोंग तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील वादग्रस्त ‘फिंगर’ क्षेत्राचं तात्पुरतं रूपांतर नो मॅन लँडमध्ये केलं जाऊ शकतं. सहा महिन्यांपासून सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी या प्रदेशात भारतीय आणि चिनी सैन्यांची गस्त थांबविली जाऊ शकते.
सूत्रांनी सांगितलं की, टप्प्याटप्प्यानं डी-एस्कलेशनच्या प्रस्तावाच्या महत्त्वपूर्ण बाबीखाली काही काळ फिंगर ४ ते फिंगर ८ पर्यंतचा परिसर हा नो-पेट्रोलिंग झोन मानला जात आहे.
याचा अर्थ असा होईल की, भारत आणि चीन हे दोन्ही सध्याच्या स्थानावरून माघार घेतील. हा प्रस्ताव मान्य झाल्यास, चीन फिंगर ८ पासून माघार घेईल, ज्यास भारत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) म्हणत आहे.
कोणत्या क्षेत्रात वाद आहे
चीन फिंगर ८ ते ४ दरम्यान आठ किलोमीटर आत आला आहे, जिथं त्यानं बंकर बनवले आहेत, तर भारत त्याला यथास्थितिभंगचं पूर्ण उल्लंघन मानतो.
दोन्ही बाजू फिंगर ४ ते फिंगर ८ दरम्यानच्या भागात गस्त घालत असतात, यामुळं अनेकदा त्यांच्यात तणाव व भांडण होतं. तलावाच्या किनाऱ्यावरील १४०० फूट उंच टेकड्या फिंगर एरिया म्हणून ओळखल्या जातात.
तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्याला ८ फिंगर विभागांमध्ये विभागलं गेलं आहे, जिथं दोन्ही बाजूंचा वाद आहे. फिंगर ८ वर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत दावा करतो आणि फिंगर ४ क्षेत्रावर आपला कब्जा कायम ठेवला आहे, परंतु यथास्थिती तोडत चीननं फिंगर ४ वर छावण्या उभारल्या आणि फिंगर ५ ते ८ दरम्यान सैन्याने गस्ती देखील घातली आहे.
डिसएंगेजमेंट रोडमॅपच्या तीन चरणांच्या प्रक्रियेअंतर्गत, फिंगर्स भागाला नो-पेट्रोलिंग झोनमध्ये रूपांतरित करण्याच्या हालचाली विचाराधीन असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. यात अलीकडील विद्यमान विवादित ठिकाणांपासून माघार घेण्यापूर्वी तलावाच्या उत्तर किनाऱ्यावरील सैन्यांची संख्या कमी करणं समाविष्ट आहे.
जर अशी स्थिती असंल तर भारत ऑगस्टच्या शेवटी सरोवराच्या दक्षिणेस व्यापलेल्या डोंगरांचा त्याग करंल. मागील दोन सैन्य कमांडर्सच्या बैठकीत या प्रस्तावांवर चर्चा झाली. मेच्या सुरुवातीस निर्माण झालेल्या गतिरोधकाचा तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत कॉर्पस कमांडर स्तरावर आठ फेऱ्या झाल्या आहेत.
सैन्याची तैनाती
तथापि, या भागातील तापमान खाली जात आहे. सध्या पारा शून्यापेक्षा २०-२५ अंशांवरून खाली जात आहे आणि अशी अपेक्षा आहे की कडाक्याच्या थंडीमध्ये सैन्याच्या तैनातीतील वाढ आणखी कमी करता येईल कारण अशा थंडीमध्ये दोन्ही बाजूंनी सैन्य तैनाती मध्ये अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे