पुणे, 16 ऑक्टोंबर 2021: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. चेन्नईने कोलकाताचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चुरशीचा सामना झाला.
या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने नवा विक्रम प्रस्थापित केलाय. टी 20 स्पर्धेत 300 व्या सामन्याचं महेंद्रसिंह धोनी नेतृत्व करत होता. धोनी 2007 पासून टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्स, इंडियन्स आणि रायझिंग पुणे संघाचं नेतृत्व केलं आहे.
धोनीने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या २९९ सामन्यापैकी 177 सामन्यात विजय, तर 118 सामन्यात पराभव सहन केलाय. तर तीन सामन्याचा निकाल लागला नाही. धोनीच्या नेतृत्वात जिंकण्याची क्षमता ५९.७९ टक्के आहे. “आपण 2005-06च्या सुमारास टी-20 क्रिकेटला सुरुवात केली. बहुतेक सामने फ्रेंचायझी क्रिकेटचे होते आणि गेल्या पाच वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही बरेच टी-20 सामने झाले आहेत”, असे टॉसच्या वेळी धोनीने सांगितलं.
महेंद्रसिंह धोनी- 300
डॅरेन सॅमी- 208
विराट कोहली- 185
गौतम गंभीर- 170
रोहित शर्मा- 153
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे