पाकिस्तानची आणखीन एक कुरापात, भारताचा तीव्र आक्षेप

रशिया, १६ सप्टेंबर २०२० ; रशियामध्ये नुकत्याच झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत पाकिस्तानने आपल्या नाकाशांत काही भारताच्या भूभागाचा समावेश करून जाणून बुजून चुकीचा काल्पनिक नकाशा सादर केला, याला भारताने तीव्र आक्षेप घेतला असून यजमान रशियाकडेही आपली नाराजी व्यक्त केली आहे.

परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी यासंदर्भात माहिती दिली. याबाबत तत्काळ विरोध व्यक्त करत भारताचे बैठकीत उपस्थित सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बैठकीतून सभात्याग केला, असंही श्रीवास्तव यांनी सांगितलं. पाकिस्तानची ही कुरापत म्हणजे बैठकीच्या मानकांचं आणि सदस्य देशांच्या अखंडता आणि सर्वभौमत्वाच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याचंही भारताने म्हंटलं आहे.

दरम्यान, नॉशनल कौन्सिल ऑफ रशियन फेडरेशनचे सचिव निकोलाई पेत्रुशेव यांनी या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल अजित डोवाल यांचे आभार मानले असून पाकिस्तानच्या या कुरपतींचं रशिया समर्थन करत नाही, असं स्पष्ट केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा