औरंगाबाद मध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना; एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार

औरंगाबाद, २३ सप्टेंबर २०२२: औरंगाबादमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. घरातून पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर गेलेल्या एका सोळा वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना औरंगाबादच्या छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

या घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त होत आहे. हे कृत्य ज्या नराधामाने केले आहे त्याचे नाव आकाश कांबळे असे आहे. मिळाल्या माहितीनुसार दोन दिवसां अगोदर ही मुलगी पाणीपुरी खाण्यासाठी घरा बाहेर पडली होती. ती परत घरी आलीच नाही अशी तक्रार मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात नोंदवली होती.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर ही मुलगी आकाश कांबळे या तरुणासोबत जाताना दिसून आले. नंंतर त्या तरुणाची ओळख पटवून तांत्रिक तपासाच्या आधारे आकाशसह त्या मुलीलाही पोलिसांनी शोधून काढले. दरम्यान चौकशी करताना आरोपीने अल्पवयीन मुलीवर आत्याचार केल्याचे सांगितले.

त्यानूसार छावणी पोलिसांनी पोक्सो कायधानूसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे‌. काही दिवसांपुर्वी एकतर्फी प्रेमातून भरदिवसा एका तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच, ही दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे‌. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा