जम्मू-काश्मीर, २८ ऑक्टोबर २०२२ : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेदरम्यान लष्कराचा एक जवान शहीद झाला आणि लष्कर-ए-तैयबाच्या स्थानिक दहशतवाद्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. पाकिस्तानी नागरिक असलेल्या आणखी एका दहशतवाद्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले. बारामुल्लाच्या शेरी भागातील वानसेरन तारीपोरा जंगल परिसरात दहशतवादी असल्याच्या गोपनीय माहितीवर कारवाई करत पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त शोध दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली.
दहशतवाद्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू
या चकमकीदरम्यान लष्कराच्या एका जवानाला गोळी लागली आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादी संघटना लष्कर निसार अहमद भट या स्थानिक दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. उस्मान नावाच्या पाकिस्तानी नागरिकाच्या आणखी एका दहशतवाद्याला पकडण्यासाठी सुरक्षा दल शोध मोहीम राबवत आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून अत्याधुनिक AKS-74U, एक मॅगझिन, २८ गोळ्या, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आले आहे.
दोन दहशतवादी ठार….
ग्रेटर काश्मीरनुसार, बारामुल्लाच्या मालवाह भागात युसूफ कांत्रो आणखी दोन दहशतवाद्यांसह ज्या चकमकीत मारला गेला, त्या चकमकमधून उस्मान पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, सुलतानपुराच्या जंगलात चकमक झाली, ज्यामध्ये लष्करांच्या एका जवानाचा आज रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेनुसार, घनदाट जंगलामुळे ऑपरेशन थांबवण्यात आले होते, परंतु गुरुवारी सकाळी पुन्हा ऑपरेशन सुरू झाले. रिपोर्टनुसार, दहशतवादी उस्मानचा शोध सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड