गोल पोस्ट इतर राजकारण सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर २०२२ : तिहार जेलमध्ये असलेले ‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांचे एकामागून एक व्हिडिओ समोर येत आहेत. रविवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुरुंगातील कर्मचारी सत्येंद्र जैन यांच्या रूमची साफसफाई करताना दिसत आहेत.

याआधी शनिवारीही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तिहार तुरुंगाचे अधीक्षक सत्येंद्र जैन यांना भेटायला आले होते. यानंतर भाजप त्यांच्यावर हल्लाबोल झाला. यावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते हरीश खुराणा यांनी टीका केली. मंत्री सत्येंद्र जैन तुरुंगात असून देखील आपल्या हुद्द्याचा गैरवापर करत असल्याचे हरीश खुराणा यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी जैन यांचे तुरुंगातील दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामधील एका व्हिडिओत जैन यांच्या कोठडीत एकजण आरामात मसाज करत असल्याचे दिसत होते. तर दुसऱ्या व्हिडिओत जैन कोठडीत हॉटेलमधील जेवण जेवताना दिसत होते.

दरम्यान, तिहार तुरुंगातील हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने जोरदार हल्ला चढवला. दुसरीकडे, सत्येंद्र जैन यांचा मसाज व्हिडिओ समोर आला तेव्हा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दावा केला होता की, सत्येंद्र जैन आजारी आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना फिजिओथेरपी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांची मालिश केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version