नवी दिल्ली: युरोपियन स्पेस एंजेसी (ईएसए) अंतराळात खराब झालेल्या सेटेलाईटचे अवशेष उचलण्यासाठी २०२५ पासून अभियान सुरू करणार आहे.
हे जगातील पहिले स्पेस जंक कलेक्टर असेल. याला क्लिअर स्पेस-१ असे नाव देण्यात आलेले आहे. हा प्रोजेक्ट स्विझर्लंडच्या स्टार्टअपद्वारे पुर्ण करण्यात येणार आहे.
याबाबत वैज्ञानिकांनी सांगितले की, अंतराळात जमा झालेले अवशेष भविष्यातील मिशनसाठी अडचण ठरू शकते. यामुळे अंतराळ साफ करण्याची गरज आहे. सध्या अंतराळात जवळपास २ हजार सेटेलाईट कार्यरत आहेत. अंतराळात पृथ्वीच्या आजुबाजूला ६० वर्षात हजारो टन कचरा जमा झाला आहे.
अंतराळातील अवशेष काढण्यासाठी क्लियर स्पेस – प्रोब अंतराळात पाठवले जाणार आहे. त्यावेळी ते ४ रोबोटिक हातांद्वारे अवशेष बाहेर काढणार आहे.
या मिशनवर जवळपास ९४३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टसाठी ब्रिटनने जवळपास १०० कोटींची मदत देखील केली आहे.