गोल पोस्ट राष्ट्रीय विधिमंडळ अधिवेशनात आज महाराष्ट्रविरोधी ठराव मांडणार : मुख्यमंत्री बोम्मई

विधिमंडळ अधिवेशनात आज महाराष्ट्रविरोधी ठराव मांडणार : मुख्यमंत्री बोम्मई

बेळगाव, २१ डिसेंबर २०२२ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या १४ डिसेंबरला नवी दिल्लीत बोलविलेली बैठक ही सीमाप्रश्नी नव्हती, तर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात होती, असे घूमजाव कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोम्मई बॅकफूटवर गेले आणि आज ‘महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही’ असा ठराव विधिमंडळात मांडण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

दिल्लीतील बैठकीबाबत बोम्मई रोज एक विधान करीत असल्यामुळे त्या बैठकीचे कर्नाटकाला किती गांभीर्य आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायाल्यात असल्यामुळे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी वा नेत्यांनी कोणतेही प्रक्षोभक निवेदन करू नये. व्यापर, उद्योगवाढीसाठी आणि गुन्हे नियंत्रणासाठी एकमेकांना सहकार्य करावे, या सूचना देण्यासाठी ही बैठक झाली होती.

मंगळवारी (ता. २०) विधानभवनात विरोधकांच्या प्रश्नामुळे मुख्यमंत्री बोम्मई कोंडीत सापडू लागले होते. त्यानंतर सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी सीमाप्रश्नी एक होण्याचे ठरविले. कर्नाटक महाराष्ट्राला एकही इंच जमीन देणार नाही, असे निवेदन दोन्ही सभागृहांत सरकारकडून देण्याचे एकमत ठरले आहे. त्यानुसार हा ठराव आज विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version