ठाण्यात कोविड लसीऐवजी दिलं रेबीजविरोधी इंजेक्शन, एक डॉक्टर आणि नर्स निलंबित

ठाणे, 30 सप्टेंबर 2021: कोरोना संसर्गाच्या धोक्यात डॉक्टर आणि नर्सेस यांच्याकडून अनेक निष्काळजीपणा च्या घटना समोर येत राहिल्या आहेत. ताजं प्रकरण ठाण्यातून समोर आलं आहे.  मंगळवारी येथे लसीकरण मोहिमेदरम्यान, एका परिचारिकेनं एका व्यक्तीला रेबीज विरोधी इंजेक्शन (कुत्रा चावण्याचे इंजेक्शन) दिलं.  मात्र, याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार आरोपी नर्स आणि या मोहिमेचे प्रभारी डॉक्टर यांना निलंबित करण्यात आलंय.
 ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितलं की, ही घटना ठाण्यातील कळवा परिसरातील आरोग्य केंद्रातील आहे.  आम्ही नर्स आणि डॉक्टरांना निलंबित केलंय  ज्यांनी रेबीज विरोधी इंजेक्शन दिलं होतं.  संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि ज्याला लसीकरण केलं गेलंय त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं गेलं आहे.
 चुकीच्या लाईनीत थांबल्यामुळं झाला गोंधळ
संदीप माळवी यांनी सांगितलं की, राजकुमार यादव हे आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचा डोस घेण्यासाठी आले होते, पण चुकून ते त्या रांगेत अले जिथं अँटी रेबीज इंजेक्शन दिलं जातं.  त्याचवेळी आरोग्य केंद्राच्या परिचारिका कीर्ती पोपरे यांनी राजकुमार यादव यांच्या केस पेपरकडं न पाहता इंजेक्शन दिलं.  संदीप पुढं म्हणाले की, लस देण्यापूर्वी रुग्णाच्या केस पेपरची तपासणी करणं हे परिचारिकेचं कर्तव्य होतं.
असा निष्काळजीपणा यूपीमध्येही आला समोर
उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये गेल्या मार्चमध्ये असाच निष्काळजीपणा समोर आला होता.  येथे 3 महिलांना कोरोना ऐवजी रेबीजचे इंजेक्शन देण्यात आलं.  यापैकी 70 वर्षीय महिलेची तब्येत बिघडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.  तिन्ही महिलांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा