अनुपम खेर यांच्या परिवाराला देखील कोरोनाची लागण

मुंबई, दि. १२ जुलै २०२०: बॉलीवूडचे बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांची व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन या दोघांची कोरणा टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आता अभिनेता अनुपम खेरची आई आणि भाऊ यांच्यासह कुटुंबातील चार सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. रविवारी सकाळी ट्विट करून अनुपम खेर यांनी याबाबत माहिती दिली.

अनुपमने व्हिडिओमध्ये सांगितले, की काही दिवसांपासून त्याची आई दुलारीची प्रकृती खराब होती. त्यांना काही दिवसांपासून भूक लागत नव्हती तसेच झोप देखील लागत नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या आईच्या रक्ताच्या तपासण्या केल्या त्यामध्ये सर्वकाही ठीक असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर, त्यांनी सीटी स्कॅन घेतला, ज्यामध्ये त्यांना तपासणी दरम्यान कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्यात सौम्य कोरोना पॉझिटिव्हची पुष्टी केली गेली आहे.

अनुपम यांची कोरोना टेस्ट नकारात्मक

यानंतर अनुपम आणि त्यांचा भाऊ राजू यांचीही कोरोना टेस्ट झाली. या अहवालात अनुपम खेर यांना कोरोना ची लागण नसल्याचे निष्पन्न झाले. तर त्यांच्या भावाची चाचणी निकाल सोम्या सकारात्मक निघाला. यानंतर राजूच्या कुटूंबाची कोरोना टेस्टही झाली. यात अनुपमची मेव्हणी म्हणजेच राजूची पत्नी आणि भाची वृंदा सौम्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले तर पुतण्याची टेस्ट नकारात्मक आली.

अनुपमने सांगितले की, त्याच्या आईला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत बीएमसीलाही कळविण्यात आले असून आता त्यांच्या घराची स्वच्छता करण्यात येणार आहे. अनुपमनेही लोकांना त्यांच्या पालकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रात्र-दिवस लोकांसाठी काम करणाऱ्या डॉक्टरांचीही त्यांनी प्रशंसा केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा