पुणे, ५ मे २०२३: अभिनेत्री अनुष्का शर्मा १६ ते २७ मे या कालावधीत फ्रान्समध्ये होणाऱ्या ७६ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार आहे. मोठा चाहातवर्ग असणारी बॉलीवूडची सुपरस्टार अनुष्का शर्माने तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने आणि असंख्य यशस्वी चित्रपटांमुळे जगभरात ओळख मिळवली आहे.
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेटसोबत ती चित्रपटसृष्टीतील महिलांची कामगिरी साजरी करणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल हा एक उत्सुकतेने परिपूर्ण असलेला कार्यक्रम आहे जो जगभरातील चित्रपट निर्माते, अभिनेते आणि सिनेमाच्या कलेचा सन्मान करतो. हा महोत्सव १६ मे ते २८ मे २०२३ या कालावधीत होणार आहे आणि अनुष्काचे चाहते तिच्या रेड कार्पेटवर दिसण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर कान्समध्ये वारंवार सहभागी होत असतात. त्यांनी त्यांच्या हटके अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या वर्षी उर्वशी रौतेला, हिना खान आणि अदिती राव हैदरी यांनीही रेड कार्पेटवर पाऊल ठेवले होते. आणि आता लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा कान्स फिल्म फेस्टीवल मधे पदार्पण करणार आहे.
टायटॅनिक स्टार केट विन्सलेटसोबत सिनेमा सृष्टीतील महिलांचा सन्मान करण्यासाठी अनुष्का सहभागी होणार आहे. अनुष्काच्या कान्स पदार्पणाची पुष्टी भारतातील फ्रेंच राजदूत इमॅन्युएल लेनन यांनी केली. त्यानी गुरुवारी अनुष्का आणि विराट कोहलीसोबतचा फोटो ट्विटर वर शेअर करुन याबाबत माहिती दिली.
न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर