“त्या” वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिलगिरी व्यक्त

मुंबई, दि.७ मे २०२०: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल केलेल्या ट्विटबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

“शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात नव्हते आणि येऊ सुद्धा शकत नाही,” असे म्हणत त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. शिवाय संभाजी ब्रिगेड कडून त्यांना कोल्हापूर मध्ये बंदी घालण्यात आली होती.

यानंतर भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीदेखील ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरुन जनतेची माफी मागितली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा