बारामती उद्योग समूहाकडून युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन

बारामती, दि. १ जून २०२० : बारामती महाभयंकर कोरोनो रोगाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेला आहे. महाराष्ट्र शासनामार्फत देखील महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्याचे आव्हान केले जात आहे. कारण सध्या महाराष्ट्र मध्ये फक्त काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. तसेच बारामती शहरात देखील रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.

याच पार्श्वभूमीवर बारामती उद्योग समूह व योद्धा प्रॉडक्शन मार्फत शनिवार दिनांक ३० मे व रविवार दिनांक ३१ मे २०२० रोजी गिरीजा ब्लड बँक बारामती येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसिंग या सर्व बाबींचे पालन करण्यात येणार आहे. श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यासाठी सहकार्य करणार असून गिरीजा ब्लड बँक येथे शनिवार आणि रविवारी सकाळी १० वाजल्यापासून रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे.

यासाठी बारामती शहर आणि परिसरातील रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून या अमूल्य कार्याला सहकार्य करावे असे आव्हान बारामती उद्योग समूह, योद्धा प्रॉडक्शन व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी आपल्या वेळेनुसार गिरीजा ब्लड बँक येथे रक्तदानासाठी उपस्थित रहावे तत्पूर्वी पुढील क्रमांकावरती कॉल करून नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा