Apple TV 4K भारतात लॉन्च

नवी दिल्ली, २१ ऑक्टोंबर २०२२: दिवाळीत इलेक्ट्रॉनिक बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. लोकही अनेक दिवसापासून पेंडींग ठेवलेली खरेदी दिवाळी पाडव्याला करतात. याच पार्श्वभूमीवर Apple TV 4K चे न्यु जनरेशन भारतात लॉन्च झाला आहे.

Apple TV 4K चे दोन मॉडेल्स लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये Wi-Fi-only आणि Wi-Fi + Ethernet मॉडेलसोबत Siri Remote सेट देण्यात आला आहे. या टिव्हीमध्ये A15 Bionic चिपसेट वापरण्यात आले आहे. त्यामुळे वीडियो डिकोडिंग, ऑडियो प्रोसेसिंग दर्जेदार होईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Apple TV 4K मध्ये A15 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने म्हटले आहे की, सीपीयू कामगिरी मागील पिढीच्या तुलनेत 50 टक्के जलद आहे. हे पूर्वीपेक्षा अधिक प्रतिसाद, जलद नेव्हिगेशन आणि स्नॅपियर UI अॅनिमेशनसह येते. तर GPU कार्यप्रदर्शन पूर्वीपेक्षा ३०% वेगवान आहे.

Apple TV 4K ला HDR10+ चा सपोर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरीक्त हा टीव्ही Dolby Vision ला सपोर्ट करतो. तेसच Dolby Atmos, Dolby Digital 7.1 आणि Dolby Digital 5.1 सराउंड साउंडलाही सपोर्ट करतो. tvOS सहज वापरता यावा यासाठी या टीव्हीसोबत Siri Remote टच-एनेबल्ड क्लिकपॅड देण्यात आले आहे.

Apple TV अॅपसह, ग्राहक १००.००० हून अधिक चित्रपट आणि मालिका ऍक्सेस करू शकतात. सिरी रिमोटमध्ये टच-सक्षम क्लिकपॅड आहे. ज्याद्वारे tvOS वर सहज नेव्हिगेट करता येते. Apple 4K TV tvOS १६ वर काम करतो. यामध्ये सिरी देखील अपडेट करण्यात आली आहे. याच्या मदतीने यूजर व्हॉइसच्या साह्याने ते नियंत्रित करू शकतो.

Apple TV 4K ची किंमत Apple TV 4K च्या W-Fi only मॉडेलसाठी ग्राहकांना १४,९०० रुपये मोजावे लागतील. या मॉडेलमध्ये 64GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तर, Wi-Fi + Ethernet मॉडेलची किंमत १६,९०० आहे. यामध्ये १२८GB मेमरी देण्यात आली आहे.

Apple ने आता लॉन्च केलेले मॉडेल सर्वसमावेशक असे असून, Apple TV 4K कंपनीच्या इतर डिव्हाईससोबत सहज कनेक्ट होतो. त्यामुळे हे मॉडेल युजर फ्रेंडली आहे. त्यामुळे हे मॉडेल नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस पडेल, असा विश्वास Apple चे वर्ल्डवाइड प्रोडक्ट मार्केटिंग उपाध्यक्ष बॉब बोरचर्स यांनी व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा