Appleचे ‘व्हॅल्युएशन’ भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त, होतोय मोठी ग्रोथ!

पुणे, 16 डिसेंबर 2021: महाकाय टेक कंपनी Apple आपल्या खात्यात आणखी एक महान विक्रम नोंदवण्याच्या जवळ आहे.  गेल्या आठवड्यात शेअर्समध्ये सुमारे 11 टक्के वाढ झाल्यानंतर Apple चे mCap तीन ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास पोहोचले आहे.  सध्या कंपनीचे mcap 2.883 ट्रिलियन आहे, जे भारताच्या GDP पेक्षा जास्त आहे.
भारतीय अर्थव्यवस्था सुस्त
जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये भारताचा GDP 2.622 ट्रिलियन इतका होता.  2021 मध्ये कोरोनामुळे प्रभावित भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार $2.946 ट्रिलियनपर्यंत वाढण्याचा अंदाज होता, परंतु आता अनेक संस्थांनी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज कमी केला आहे.  अशा स्थितीत भारतीय जीडीपी 2.9 ट्रिलियन डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता बळकट झाली आहे.
एका वर्षात mcap 30 टक्क्यांनी वाढला
दुसरीकडे Appleचा शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.  रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, गेल्या एका वर्षात कंपनीचा एमकॅप 30 टक्क्यांनी वाढला आहे.  Appleला दोन ट्रिलियन डॉलर्सच्या कंपनीतून तीन ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास जाण्यासाठी फक्त 16 महिने लागले.  यापूर्वी कंपनीला एक ट्रिलियनवरून दोन ट्रिलियन होण्यासाठी दोन वर्षे लागली होती.  ज्या प्रकारे गुंतवणूकदारांचा Apple वर विश्वास आहे, Appleचा mcap कोणत्याही दिवशी $3 ट्रिलियनचा टप्पा ओलांडेल.
 मागील 30 वर्षांसाठी सरासरी वार्षिक 22% परतावा
सोमवारी Appleचा शेअर सुमारे दोन टक्क्यांनी घसरला आणि $175.74 वर बंद झाला.  $3 ट्रिलियन mcap च्या पातळीवर जाण्यासाठी, Apple च्या स्टॉकला $182.86 पार करावे लागेल.  Apple ही सध्या जगातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.  कंपनीने 1990 पासून गुंतवणूकदारांना दरवर्षी सरासरी 22 टक्के परतावा दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा