जालना १४ जुलै २०२४ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय, जालना यांच्याकडून चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडुन विविध व्यवसायांसाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजु अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी या पूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय, जालना येथे उपस्थित राहुन दाखल करावेत. सर्व योजनांचा कर्जप्रस्ताव महामंळाच्या विहित नमुन्यातील अर्ज दि. ३१ जुलै २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जालना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना या ठिकाणी स्विकारले जाणार आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी