राष्ट्रीय मानवअधिकार सुरक्षा संघ पुणे जिल्हा उपसचिव पदी सोमनाथ साखरे यांची नियुक्ती

12

पुणे, २६ ऑक्टोबर २०२०: आज राष्ट्रीय मानवअधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये मा. सोमनाथ भाऊ साखरे यांची पुणे जिल्हा उपसचिव पदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. संदीपजी लोंढे यांच्या हस्ते सोमनाथ साखरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सर्व समाज बांधवांना त्यांचा हक्क, न्याय व मदत याद्वारे त्यांनी समाजामध्ये जे काही कार्य केले आहे, त्याची दखल घेत मानवाधिकार सुरक्षा सघंच्या आज पुणे जिल्हा उपसचिव पदी सोमनाथ साखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

यावेळी पुणे शहर सचिव अनिकेत (आण्णा) बांदल, तालुका अध्यक्ष तानाजी लोहकरे आणि अभिजित दहिवले सामाजिक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते .

मा.सोमनाथ भाऊ साखरे यांचे राष्ट्रीय मानवअधिकार सुरक्षा संघ परिवारात स्वागत करण्यात आले व पुढील सामाजिक कार्याकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे