नीरेतील एक गाव एक गणपती उपक्रमाचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून कौतुक

पुरंदर ३१, ऑगस्ट २०२०: नीरेकरांनी राबवलेल्या एक गाव एक गणपती उपक्रम कौतुकास्पद असून याबाबत नीरेतील तरुण मंडळे व राजकीय नेतृत्व या दोघांचा ही आभारी आहे. यापुढेही या तरुण मंडळांनी एकत्र येत समाजामध्ये अनेक सामाजिक बदल करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथील एक गाव एक गणपती उपक्रमा अंतर्गत बसवण्यात आलेल्या गणपतीची आरती आज पुरंदर भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी त्यांनी तरुणांचा खांद्यावर कौतुकाची थाप मारली.

पोलिसांच्या आवाहना नंतर नीरेतील ४७ गणेश मंडळांनी एकत्र येत एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला. या उपक्रमाला आज उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यानंतर त्यांनी उपस्थित तरुण मंडळाच्या सदस्यांसी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नीरा शहरातील तरुणांनी एक आदर्श समाजापुढे निर्माण करून ठेवला आहे. अनेक विविधता असलेल्या नीरा शहरात सर्वांनीच एकोप्याचे दर्शन घडवले. या कोरोना महामारीच्या काळात प्रशासनाला अपेक्षित असलेल्या सहकार्य केलं. त्यामुळेच नीरा शहरात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवता आली. आता गणेश विसर्जनाच्या वेळीसुद्धा सर्वांनी सहकार्य करावे आणि गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे. अशा सूचना त्यांनी यावेळी तरुण मंडळ दिल्या. या प्रसंगी माजी सरपंच राजेश काकडे माजी उपसरपंच विजय शिंदे, कर्नलवाडीचे उपसरपंच भरत निगडे, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, मिरजेचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, पोलीस पाटील राहुल शिंदे, कुंभार समाजाचे राज्याध्यक्ष कुंभार राजे, मंगेश ढमाळ, दीपक डागा नीरा आऊट पोस्टचे पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा