हवाई दलासाठी ५६ वाहतूक विमानांच्या खरेदीस मंजुरी, १६ स्पेनमधून येणार तर ४० टाटा बनवणार

नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२१: केंद्र सरकारच्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) भारतीय हवाई दलासाठी ५६ (c -295 MW) वाहतूक विमाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. करारावर स्वाक्षरी केल्याच्या ४८ महिन्यांच्या आत, स्पेनकडून १६ विमाने प्राप्त होतील, तर भारतातील टाटा कन्सोर्टियमद्वारे ४० विमाने तयार करून १० वर्षांच्या आत आयएएफकडे सोपविली जातील. हा अश्या प्रकारचा पहिला प्रकल्प आहे ज्यात एक खासगी कंपनी भारतात लष्करी विमानांची निर्मिती करेल.

सर्व ५६ विमानांमध्ये स्वदेशी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सुइट बसवण्यात येईल. कराराच्या ४८ महिन्यांच्या आत, १६ विमाने स्पेनमधून फ्लायअवे स्थितीत प्राप्त होतील. केंद्र सरकारने सांगितले की या कार्यक्रमाद्वारे ६ हजार ६०० लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. यापूर्वी, भारतीय हवाई दल प्रमुख आर के भदौरिया म्हणाले होते की, आयएएफ पुढील दोन दशकात सुमारे ३५० विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे.

भदौरिया म्हणाले की, आता हलकी लढाऊ विमाने खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. तसेच, विमान स्वदेशी कंपन्यांकडूनच खरेदी केले जातील. हवाई दल प्रमुखांनी भारतीय एरोस्पेस क्षेत्राच्या विषयावर आयोजित परिषदेला संबोधित करताना सांगितले की, चीन कडून मिळत असलेली आव्हाने पाहता, भारतीय हवाई दलाची संपूर्ण ताकद आणखी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

हवाई प्रमुख आरकेएस भदौरिया म्हणाले की, उत्तरेच्या शेजारी देशाकडे पाहताना आपल्याकडे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असले पाहिजे, जे सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याच कंपन्यांनी स्वदेशी बनवले पाहिजे. एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संरक्षण क्षेत्रात भारताच्या स्वावलंबनावर भर दिला आणि सांगितले की, भारतीय हवाई दल पुढील दोन दशकात देशातून सुमारे ३५० विमाने खरेदी करण्याची तयारी करत आहे. हा एक ढोबळ अंदाज आहे असेही ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा