बारामती: बारामती शहराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील विविध विकास कामांना मोठा विकास निधी मंजूर करून दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात बारामती शहरात विकासाची गंगा वाहणार आहे. या बाबत काल झालेल्या सर्वसाधारण सभेत ४९ विषयांना मंजुरी देण्यात आली.
बारामती विधानसभा मतदार संघाने अजित पवार यांना राज्यातून पहिल्या क्रमांकाने निवडून दिल्यावर अजित पवार यांनी देखील जाहीर सभेत या बद्दल बोलून दाखवले आहे. उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री म्ह्णून अजित पवार काम करत असताना शहरातील मागील पाच वर्षात खुंटलेला विकास भरून काढण्यासाठी शहरात विकास कामांचा सपाट लावला आहे.
शिवसृष्टी निर्माण करणे, शहरात सौरऊर्जा प्रकल्प उभा करणे, शहरात गॅस लाईन टाकणार असल्याने आता घरात गॅस येणार आहे. तर शहरातील रस्ते तयार करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील वाढीव हद्दीत रस्ते करणार आहे, स्वच्छतेच्या धर्तीवर ठेकेदार पद्धतीने कर्मचारी वाढवणार आहे, भुयारी गटार,वाढीव हद्दीचा पालिका हद्दीत समावेश झाल्याने पिण्याच्या पाण्याचा तिसरा साठवण तलाव तयार करणे, आप्पासाहेब पवार मार्गावरील वाहून गेलेला पूल नव्याने बांधणे, तांदुळवाडी हद्दीतील ३० मीटरचा रस्ता तयार करणे, नीरा डावा कालवा सुशोभित करणे, श्रीमंत बाबूंजी नाईक वाडा सुशोभित करणे अशा अनेक विकास कामांना सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.