हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी जागेसंदर्भातील अटी शिथिल करण्यास मान्यता

पुणे, १३ मे २०२१: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी प्रदान केलेल्या बालेवाडी येथील जागेसंदर्भातील शासन ज्ञापनातील अटी शिथिल करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

हा मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी सहभागाने “संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरीत करा” या तत्वावर विकसीत करण्यात येत आहे. निविदेतील अटी/शर्तीनुसार सदर जमीन सवलतदारास सवलत कालावधीकरीता व्यावसायिक वापरांतर्गत त्रयस्थ हितसंबंध निर्माण करण्यास तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी प्रदान केलेल्या जागेचा वापर तीन वर्षाच्या आत सुरु करण्याबाबतची अटही शिथिल करण्यासही मान्यता देण्यात आली.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पीएमआरडीएकडून सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) या तत्त्वावर मेट्रो प्रकल्पाची उभारणी प्रस्तावित आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकार निधीऐवजी जागेच्या स्वरूपात हिस्सा देणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा