१ एप्रिल २०२० पासून करपात्र व्यक्तींचे २६,२४२ कोटी रुपयांचे परतावे

नवी दिल्ली, दि. २२ मे २०२०: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सी बी डी टी) ने १ एप्रिल ते २१ मे २०२० या कालावधीत, १६,८४,२९८  करपात्र व्यक्तींचे २६,२४२ कोटी रुपयांचे कर परतावे दिले आहेत.

या कालावधीत, १५,८१,९०६ करपात्र व्यक्तींचे १४,६३२ कोटी रुपयांचे प्राप्तिकर परतावे देण्यात आले आहेत तर, १,०२,३९२ करपात्र व्यक्तींचे ११,६१० कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर परतावे देण्यात आले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पैकेजची घोषणा केल्यानंतर, कर परतावे देण्याच्या प्रक्रियेला आणखी गती देण्यात आली असून जलदगतीने हे परतावे बँकेत जमा केले जात आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने, गेल्या, म्हणजेच १६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात, ९ ते १६ मे या कालावधीत २०५०.६१ कोटी रुपयांची रक्कम ३७,५३१ प्राप्तिकर पात्र व्यक्तींच्या खात्यात जमा केली आहे. तसेच, २८७८ कॉर्पोरेट करपात्र व्यक्तींच्या खात्यात ८६७.६२ कोटी रुपये रक्कम जमा केली आहे. या आठवड्यात, म्हणजेच १७ ते २१ मे या कालावधीत, आणखी १,२२,७६४ प्राप्तिकरपात्र व्यक्तींच्या खात्यात २६७२.९७ कोटी रुपये, तर ३३,७७४ कॉर्पोरेट करपात्र खात्यात, यात एमएसएमई, प्रोप्रायटरशिप इत्यादी खात्यांमध्ये ६७१४.३४ कोटी रक्कम जमा करण्यात आली. म्हणजेच, एकूण  १,५६,५३८ करपात्र व्यक्तींच्या खात्यात, ९३८७.३१ कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा