आर अश्विनने मोडला भज्जी- कुंबळेचा विक्रम

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळवला.
 
  या विजयात भारतीय गोलंदाज आर. अश्विनने चमकदार कामगिरी करत कसोटी कारकीर्दीतील 350 बळींचा टप्पा गाठला आहे.
 
  मुरलीधरणची बरोबरी :  याआधी मुरलीधरणने सर्वांत कमी कसोटी डावांत (66), 350 बळींचा टप्पा गाठण्याचा विक्रम केला होता. मात्र आता अश्विननेदेखील 66 व्या कसोटी डावात 350 बळींचा टप्पा गाठल्याने मुरलीधरन व अश्विन यांचा विक्रम बरोबरीत आला आहे.
 
  याच बरोबर अश्विनने हरभजनसिंग, अनिल कुंबळे तसेच कपिल देव यांचाही विक्रम मोडला आहे. हरभजनला 350 बळींसाठी 83 तर कुंबळे आणि कपिल देव यांना अनुक्रमे 77 व 100 कसोटी सामने खेळावे लागले होते. अश्विनने हीच कामगिरी 66 कसोटी सामन्यांत करत या सर्वांचा विक्रम मोडला आहे.
 
   दरम्यान, आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान दोन्ही डावांत मिळून 8 बळी घेत अश्विनने कसोटी 350 बळींचा एकदा गाठला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा