मजूरांवर टिका करणाऱ्यांना त्यांच्या दुःखाची जाणीव आहे का?

मुंबई, २७ एप्रिल २०२०: मोदींनी पूर्व तयारी न करता लॉकडाऊन केले खरे पण त्याच वेळी हजारो परप्रांतीय कामगार मजूर आहे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. लॉकडाऊन नंतर देशातील सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली याचबरोबर सर्व उद्योग धंदे छोटे व्यवसाय देखील बंद झाले. त्यामुळे या मजुरांना ना त्यांच्या घरी जाता येत आहे ना पोट भरण्यासाठी कुठे काम करता येत आहे. शिवसेनेने सामनामधून यावर प्रश्न विचारला आहे.

सामनामधील अग्रलेखामध्ये असे म्हंटले गेले आहे की, घरात बसून ‘आहात तेथेच थांबा’ म्हणणाऱ्यांना मजूरांचे दुःख काय कळणार? मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत परप्रांतीय मजूर अडकले आहेत. त्यांना आपापल्या गावी जायचे आहे. गावी जाण्यासाठी ते धडपडत आहेत व नको ते उपद्व्यापही करत आहेत, पण नितीन गडकरी यांनी एक फार महत्त्वाचा सवाल केला आहे. ते म्हणाले की , “परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी जायचे आहे, पण त्यांच्या गावी जाऊन ते खाणार काय?” या प्रश्नाचे उत्तर आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आहे.
साधारण आठ राज्यांचे मजूर महाराष्ट्राच्या विविध भागांत अडकून पडले आहेत. हा आकडा कोणी ३.५ लाख सांगतात, तर कोणी ५ लाखांवर सांगत आहेत. काही मजूर शेकडो मैलांची पायपीट करीत आपापल्या गावी निघाले व पोहोचले. त्यातील काहीजण घरी पोहोचण्याआधीच अपघात किंवा अतिश्रमाने मरण पावल्याचे प्रकार क्लेशदायक आहेत. आहात तेथेच थांबा,
सुरक्षित राहा असे आवाहन जे करतात ते
आपापल्या घरी सुरक्षित राहून असे आवाहन
करीत असतात. त्यांना या मजूरांचे दु:ख,
पायपिटीच्या यातना कशा समजणार?’ असा प्रश्न शिवसेना यातून केला आहे.

राज्य सरकार देखील ह्या मजूरांची शक्य होत आहे तेवढी काळजी घेत आहे. रोजचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था राज्य सरकारने करून दिली आहे. तरीही घरापासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या या कामगारांना घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. यांच्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा