पुणे;२९ जूलै २०२२: पुण्यातील एका रस्त्यावर धक्कादायक घटना झाली आहे. यात काही लोक हातामध्ये काठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला करत होते. घटनास्थळी काही महिलाही उपस्थित होत्या, त्या ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या. ही घटना येरवडा यथील शिवराज चौक येथील आहे.
जागेच्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. मारामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगाराकडून हाणामारीचा प्रकार सूरु असल्याने पोलिसांचा वचक नसल्याचं नागरीक बोलत आहे.
दरम्यान येरवडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करावं, अशी मागणी नागरीक करत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर काही लोक गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर