अर्जुन तेंडुलकर याने ठोकले ५ चेंडूत ५ षटकार

मुंबई, १५ फेब्रुवरी २०२१: येत्या १८ फेब्रुवारीला आयपीएल लीलावाचे आयोजन करण्यात येणार आहे.अशातच यंदाच्या बोलीच खास आकर्षण असणार आहे. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याने आतापर्यंत खेळलेल्या काही स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. परंतु, नुकत्याच खेळल्या गेलेल्या पोलिस शिल्ड इन्विटेशन स्पर्धेत त्याने आपल्या फलंदाजीने त्याने दाखवून दिले आहे की, तो सुध्दा या लिलावात मुख्य दावेदार आहे.

१४ फेब्रुवारी रोजी ग्रुप ए कडून खेळताना त्याने अवघ्या ३१ चेंडूंमध्ये ७७ धावांची खेळी केली. फक्त फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीमध्येही त्याने कमाल दाखवली. ४१ धावा देत त्याने ३ खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. २१ वर्षीय अर्जुन तेंडुलकरने आपल्या या खेळी दरम्यान ५ चौकार आणि ८ षटकार लगावले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाशीर दाफेदारच्या एका षटकात तर त्याने ५ षटकार लगावले. फक्त सचिन नव्हे तर त्याच्या संघाकडून खेळणाऱ्या सलामीवीर केविन डीएलमेडाने ९६ धावांची तर प्रगनेश खांडिलेवारने ११२ धावांची खेळी केली. तिघांच्या या कामगिरीमुळे एमआयजी संघाने इस्लाम जिमखाना संघाचा १९४ धावांनी पराभव केला.

नाणेफेक जिंकल्यानंतर एमआयजी क्रिकेट संघाने फलंदाजीचा पर्याय निवडला. अर्जुन, प्रगनेश आणि केविनच्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी ४५ षटकात ७ गडी गमावून ३८५ धावांची भव्य धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल इस्लाम जिमखानाचा संघाला फक्त १९१ धावा करण्यात यश आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा