घुसखोरीवर सैन्याची कारवाई, ४ दिवसात १३ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीर, दि. २ जून २०२०: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईत आतापर्यंत १३ अतिरेकी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सैन्याने सोमवारी ठार केले. त्याचबरोबर २८ मे पासून सुरू झालेली घुसखोरी रोखण्याच्या मोहिमेत आतापर्यंत चार दिवसात १३ दहशतवादी ठार झाले आहेत.

सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की २८ मे पासून घुसखोरीविरोधी मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत भारतीय सैन्याने पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान १० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पुंछ जिल्ह्यातील खेड्यांमध्ये शोध मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, सैन्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की सोमवारी नौशेरा सेक्टरमध्ये तीन अतिरेकी ठार झाले. जम्मू काश्मिरच्या नौशेरा येथील भारत-पाकिस्तान सीमेवर काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना भारतीय लष्कराच्या सैनिकांनी नाकाम केले आणि तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टरजवळ दहशतवादी सकाळी घुसखोरीचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने त्याला ठार केले. या भागात अद्याप शोध मोहीम सुरू असून सखोल तपास केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा