सेना प्रमुख जनरल एम. एम. नरवणे लडाखमध्ये दाखल

लडाख, ३ सप्टेंबर २०२०: लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरावणे आज सकाळी लडाख येथे दाखल झाले, असून ते पुढील दोन दिवस लडाखमध्ये असतील. पूर्व लडाखमधील पँगोंग त्सोच्या दक्षिण किनारपट्टीवर झालेल्या ताज्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर जनरल नरवणे लडाख पोहचले. २९ आणि ३० ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री भारतीय सैन्याने घुसखोरीसाठी पीएलएच्या प्रयत्नांना शह दिला.

घटनेनंतर ब्रिगेडियर स्तरावरील चर्चा ३१ ऑगस्टपासून चुचुल सीमेवर तीन दिवस चालली. पूर्व लडाख प्रदेशातील समस्या सोडविण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांची भेट महत्त्वाची आहे.

त्या पोस्ट मधील सैन्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधल्यानंतर जनरल यांना लडाखमधील फायर अ‍ॅण्ड फ्युरी मुख्यालयात माहिती दिली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा