निगडी-प्राधिकरण, ७ जानेवारी २०२३ : शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी भारत सरकारद्वारे सुरू केलेल्या विद्यांजली योजनेअंतर्गत आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोड यांच्यातर्फे देहू पंचक्रोशीतील खालील शाळांना दत्तक घेण्यात आले आहे.
श्री कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर, चिंचोली, जिल्हा परिषद शाळा क्र. १, देहूगाव, जिल्हा परिषद शाळा क्र. २ देहूगाव. या उपक्रमाअंतर्गत आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोडच्या वतीने तीनही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यांजली उपक्रमाची सुरवात सकाळची प्रार्थना, प्रतिज्ञा व सुविचाराने झाली. नंतर स्वच्छता अभियान व आर्मी दिवस या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोडच्या विद्यार्थ्यांनी या तीनही शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेतल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतला. यात मुलांनी ‘फुले’, ‘माझा आवडता खेळ’, ‘माझे आवडते कार्टून’ या विषयांवर चित्रे रेखाटली.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर चिंचोलीच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोड येथे आमंत्रित केले गेले. आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोडच्या वतीने इयत्ता पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा घेतल्या गेल्या. या स्पर्धा आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोडच्या प्रशस्थ मैदानावर घेण्यात आल्या. यात इयत्ता पाचवीसाठी धावण्याची स्पर्धा,१३ मीटर डॅश गोळाफेक व इयत्ता सहावी आणि सातवीसाठी कबड्डीचे सामने खेळण्यात आले.
या स्पर्धेसाठी आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोडच्या इयत्ता आठवी, नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्मी पब्लिक स्कूलने शालोपयोगी क्रीडा पुरविले. हे साहित्य संबंधित शालेय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे व प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात आली. वाटप करण्यात आली. केवटी सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने झाली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील
खूप छान. ‘देहूरोडच्या आर्मी पब्लिक स्कूलने देहू पंचक्रोशीतील तीन शाळा ‘विद्यांजली योजने’अंतर्गत घेतल्या दत्तक’ ही ‘न्यूज अनकट’चे प्रतिनिधी श्री. सतीश पाटील यांनी संपादित आणि मुद्रितशोधन करून अतिशय शुद्ध स्वरूपात प्रसिद्ध केली त्याबद्दल श्री. सतीश पाटील सरांचे आणि ‘न्यूज अनकट’च्या सर्व टीमचे मनापासून आभार आणि अभिनंदन!💐💐
खूप छान. ‘न्यूज अनकट’चे प्रतिनिधी श्री. सतीश पाटील यांनी संपादित आणि मुद्रितशोधन करून अतिशय शुद्ध स्वरूपात प्रसिद्ध केली त्याबद्दल श्री. सतीश पाटील सरांचे आणि ‘न्यूज अनकट’च्या सर्व टीमचे मनापासून आभार आणि अभिनंदन!💐💐