गोल पोस्ट राष्ट्रीय जम्मू काश्मीरमध्ये सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर, २८ डिसेंबर २०२२ : जम्मू काश्मीरमधील सिधरा परिसरात सैन्याची आतंकवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत तिन्ही आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, ट्रकमधून श्रीगरला जात असताना लष्कराकडून आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुढे ते म्हणाले, आम्हाला एका ट्रकची असामान्य हालचाल दिसली आणि आम्ही त्याचा पाठलाग केला. जम्मूमधील सिध्रा येथे ट्रक थांबवण्यात आला आणि दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले असता त्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात ते ठार झाले. मात्र, ट्रकचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाला.

दरम्यान, तीन स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन दहशतवाद्यांच्या ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. तर तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंठस्थान घातलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी शोपियाचा लतीफ लोन आहे. हा काश्मिरी पंडित पुराण कृष्ण भटच्या हत्येत सहभागी होता. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव उमर नजीर आहे. अमर नेपाळच्या तिल बहादुर थापाच्या हत्येत सहभागी होत. दहशतवाद्यांकडे एक Ak-47 रायफल आणि पिस्टल जप्त आढळले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

error: Content is protected !!
Exit mobile version