पिंपरी चिंचवड, दि. ११ मे २०२०: प्रभाग क्रमांक १४ मधील रामनगर परिसरातील ५०० नागरिकांसाठी रोजचे जेवण देण्याची व्यवस्था कै. सुनिल दुर्गे प्रतिष्ठान काळभोर नगर यांच्या वतीने सुरु करण्यात आली होती. सोमवार ते शनिवार गरजवंतांची यादी तयार करणे आणि रविवारी अत्यंत शिस्तबद्ध पणे, नियमांचे पालन करुन वाटप करणे असा सुनियोजित कार्यक्रम राजू दुर्गे यांनी सुरु केले होते.
राजू दुर्गे यांच्या या उपक्रमाची काळभोर नगर, मोहननगर आणि संभाजी नगर परिसरात दररोज दुपारी २ वाजता मेवाडा टी सेंटर, सेंट अँड्र्यूज शाळेसमोरील भागात रामनगर व आसपासच्या कंपन्यांमधील गरजू लोकांकरीता खिचडी वाटप करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे राजू दुर्गे हे माजी नगरसेवक असून देखील या परिसरातील विद्यमान नगरसेवकांना लाजवेल अशा प्रकारचे काम करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे काळभोर नगर, चिंचवड स्टेशन, मोहन नगर, रामनगर परिसरातील गरजवंत नागरिकांचा कल राजू दुर्गे यांच्या काळभोर नगर येथील कार्यालयाकडे वाढला असल्याचे तेथील रहिवासी सांगत आहेत.
अशा शिस्तबद्ध अन्न वाटप उपक्रमात श्री राजू दुर्गे यांच्या बरोबर नंदु भोगले, युवराज शिंदे, रमेश येवले, देव दुर्गे, कृष्णा बाराहाते, ऋषी उडाफे, साई बाराहाते आणि गणेश बंब हे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
गेल्या महिनाभरापासुन कोरोनाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना ते करत असलेले मदत कार्य सध्या बंद करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांचे थैमान मोहननगर, चिंचवड स्टेशन, संभाजी नगर या काळभोर नगरला लागून असलेल्या भागांमध्ये येऊन पसरले आहे. त्यामुळे या सर्व भागातील सीमा रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांच्या या निर्णयाला प्रतिसाद देत तुर्तास तरी काही काळापुरते हे काम थांबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी